शिर्डी प्रतिनिधी/
आपल्या देशातील आय ए एस या पदवीला देशात सर्वोच्च स्थान आहे. या परीक्षेला एक खास वलयं असून या परीक्षेच्या आधारावर अनेक तरुण, तरुणी मेहनत, अभ्यास, आणि संघर्षांच्या जोरावर उत्तीर्ण होऊन आपल्या देशाची सेवा करत आहे. त्यापैकी या सेवेत आपल्या देशात अनेक दिव्यांग बांधव, भगिनी सेवा देत आहेत अर्थात दिव्यांग हा घटक आपल्या देशात शेवटचा व महत्वपूर्ण मानला जात असून त्यांच्यासाठी देशात सर्वच क्षेत्रात विशेष सवलती आहेत. याचाच गौरफायदा घेत शिर्डी साई संस्थांनच्या तत्कालीन आय ए एस असल्याल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी स्वतः दिव्यांग अर्थात कर्नबधिर असल्याचा दाखला पुणे येथील बी जे मेडिकल कॉलेज मधून घेऊन त्या आय ए एस झाल्या आहेत परंतु त्यांच्या या प्रमाणपत्रावर दिल्ली येथील एम्स या प्रख्यात इन्शुटूट येथे सस्पेकटेड केस अर्थात संशयास्पद हा अभिप्राय नोंदविला आहे. तरी सुद्धा त्या नागालँड कॅडर मधून आय ए एस झाल्या होत्या, विशेष बाब म्हणजे त्यांनी आय ए एस पदवी बहाल केल्यानंतर वशिला आणि पैशाच्या जोरावर नागालँड मधून थेट महाराष्ट्र राज्यात बदली करून घेतली, अर्थात कायाद्यानुसार ही बदली करताना केंद्र शासनाच्या वेबसाईटवर आपली सर्व माहिती देणे अनिवार्य असताना त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपली सेवा कायम ठेवली. अर्थात शिर्डी येथील त्यांचा वादग्रस्त कार्यकाल व राजेंद्र भुजबळ यांनी उठविलेल्या सत्याचा आवाजाचा त्यांना राग आला व त्यांनी एक दिवस राजेंद्र भुजबळ वर 353 सारखा खोटा गुन्हा नोंदविण्यास पोलीस प्रशासनावर दबाव आणला, अखेर तो गुन्हा खोटा असल्याचा पोलीस तपासात सिद्धही झालं असल्याचे पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी सांगितले
राजेंद्र भुजबळ यांनी पुढे सांगताना म्हणाले कि सध्या पूजा खेडकर हे प्रकरण देशभर गाजत असले तरी, श्रीमती भाग्यश्री बानायात हे प्रकरण सुद्धा त्याच प्रकारचे असून याविषयी मी रीतसर तक्रार पुराव्यासह राज्यशासन व केंद्रशासन यांच्याकडे केली असून त्याचाच परिपाक म्हणून त्यांना पुन्हा राज्याबाहेर पाठविले असले तरी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर ज्यांनी देशाची फसवणूक करून मूळ दिव्यांग बंधू, भगिनीवर अन्याय केला आहे, अशा स्वार्थी, बोगस आणि गद्दार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अर्थात संविधानाने दिलेला अधिकार आज मी पणाला लावला असून लवकरच पूजा खेडकर नंतर दुसऱ्या अध्यायाची सुरवात होणार आहे. पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी इशारा दिला आहे