अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील ते चार खंडणीखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या समोर उपोषण
प्रतिनिधी संगमनेर संगमनेर शहरात मागील काही दिवसापूर्वी अहमदनगर गुन्हे शाखेतील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कायद्याचे धाक दाखवून तसेच कठोर कारवाई करण्याची भीती दाखवून शहरातील दोन किरकोळ गुटखा विक्रेत्यांकडून सव्वा दोन लाख रुपये रक्कम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून वसूल करून शहरातून निघून गेले तसेच व गुटखा विक्रेत्यांना आपल्या गाडीत बसवून गंभीर मारहाण देखील केली होती तसेच एका गुटखा विक्रेता कडे तब्बल सात लाख रुपये खंडणी मागितली होती परंतु तडजोड करून दीड लाख रुपये खंडणी वसूल करण्यात ते यशस्वी देखील झाले तसेच 75 हजार रुपये एका गुटखा विक्रेत्यांकडून देखील घेतले या दोघांसोबत झालेल्या अन्याय न्याय मिळवून देण्यासाठी शहरातून एक आरटीआय कार्यकर्ता यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज पासून उपोषण सुरू केले आहे आता वरिष्ठ याची दखल घेता का तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करता का हे आता बघणे महत्त्वाचे ठरेल
जाहिरात