आदिवासी ठाकर, ठाकूर समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे २ जून रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिर्डी येथील कोपरगाव रोडवर असणाऱ्या साई पालखी निवारा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत विविध सामाजिक विषयांवर विचार मंथन होणार आहे. ‘
मी समाजाचा, समाज माझा’ या संकल्पनेतून विविध विषयावर संवाद यात्रेत चर्चा होणार आहे. सध्या समाजामध्ये मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढत आहे. तसेच जमातीमध्ये झालेला बदल, लग्न जमण्यासाठी येणाऱ्या अडचणी, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह जमवतांना नातेवाईकांच्या वाढलेल्या अपेक्षा याविषयावर संवाद यात्रेत विचारमंथन होणार आहे.
समाज बांधवांनी संवाद यात्रेत सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल आदिवासी ठाकर, ठाकूर समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील चंद्रकांत सोनवणे व
शिर्डी येथील महेश पवार दिलीप अण्णा जगताप मिलिंद ठाकर प्रवीण अंभोरे रत्नमाला सुरडकर गीतांजली पवार योगिता ठाकूर सम्पर्क साधावा