शिर्डी( प्रतिनिधी)शिर्डी पोलिसांनी दहा डिसेंबर रोजी मध्यरात्री नाकाबंदीत
सावळीविहीर फाटा येथे एका चार चाकी वाहनात १४ लाख 43 हजार रुपयाचा ९७ किलो गांजा जप्त केला होता त्यात बारा लाख रुपये किमतीची चार चाकी वाहनाचा देखील समावेश होता.
या गुन्ह्यात अर्जुन धोंडीराम कांबळे वय ३५ वर्षे राहणार निमगाव कोराळे याला अटक केल्यानंतर राहता न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी दिली
या प्रकरणात जे चार चाकी वाहन पकडण्यात आले आहे ते एका साकुरी येथील प्रतिष्ठीत माणसाच्या नावावर असले तरी ते त्यानी काही वर्षापूर्वी विक्री केली असल्याची चर्चा असुन
या गंभीर गुन्हात जो आरोपी पकडण्यात आला आहे त्या चालकावर या अगोदर कुठलाही गुन्हा दाखल नसला तरी तो घेऊन येत असलेला गांजा समृद्धी मार्गे घेऊन आलेला होता तो समृद्धी वरुन उतरल्यावर त्यास नाकाबंदी मध्ये पकडले असले तरी या प्रकरणाची गंभीर दखल शिर्डी पोलीसांनी घेतली असून उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तो हा गांजा कोणासाठी आणत होता यांचा तपास केला जात आहे.