आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिर्डीत ग्रामस्थांनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.
दोन वर्षांपूर्वी साई मंदिरात फुले, हार आणि प्रसाद आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. कोविडमुळे हे निर्बंध लागू करण्यात आले होते. या बंदीमुळे शिर्डीतील फुलांचे व्यापारी आणि आजूबाजूच्या सुमारे चारशे एकर क्षेत्रात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. बंदी हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केलं होतं.
समितीच्या अहवालाच्या आधारे साई संस्थानच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी साई संस्थानने न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सर्वांना लवकरच परवानगी मिळेल अशी आशा वाटत होती. त्यातच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने फूल, हार नेण्यास परवानगी दिली आहे.
श्री साईबाबांना फुले हे प्रिय होते बाबांनी स्वहस्ते लेंडीबागेत फुलाची बाग फुलविली होती बाबा हयात असले पासून साईभक्त भक्तीभावाने बाबांना हार फुले अर्पण करीत असत असा उलैख साईचरीत्राता आहे त्यामुळे भक्तानं ची मागणी पुर्ण झाली आहे त्यामुळे फुले उत्पादक शेतकरी सुखवाला आहे कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत कमलाकर कोते जिल्हाप्रमुख शिवसेना