कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत करंजी शिवारात फिर्यादीच्या ऑल्टो गाडीस आरोपी नं. १ अनिल दगडू अहिरे याने त्याचे रिक्षाचा कट मारला त्यात फिर्यादीच्या गाडीचे नुकसान झाले होते. व त्या झालेल्या नुकसानीची भरपाई देतो तु दि.०१/०६/२०१७ रोजी राजलक्ष्मी ओरीगेशन दुकानासमोर येवला नाका येथे ये, असे सांगून दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास अगर त्या दरम्यान यातील आरोपींनी गैरकायदयाची मंडळी जमवून एकत्रित येवून दि. ३१/०५/२०१७ रोजी फिर्यादीच्या ऑल्टो गाडीस कट मारल्याचे कारणावरून नुकसान मागितले या कारणावरून आरोपी नं. २ याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे डावे पायावर जबर मारहाण करून पायाचे हाड फॅक्चर केले व तसेच आरोपी नं. १ व ३ व इतर अनोळखी अोंनी फिर्यादी व फिर्यादीचे आई वडील व साक्षीदार यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व तेथून निघून गेले म्हणून आरोपींविरूध्द भा.द.वि. कलम ३२६,१४१,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
सदर केस मध्ये मे. न्यायाधीश श्री एम. ए. शिलार साहेब, अति. मुख्य न्यायदंडाधिकारी क. १ यांचे समोर कामकाज चालले. सदर केसमध्ये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री प्रदीपकुमार थोडिंबा रणधीर, यांनी युक्तीवाद केला. सदर घटनेबाबत फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब व पंचनामे शाबीत करणारे पंच यांची साक्ष व वैदयकीय अधिकारी यांचे साक्ष यांचा पुरावा बघून आरोपी नं. १ ते ३ यांना भा.द.वि. कलम ३२६ प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास व रू. २०००/- दंड, तसेच भा.द.वि. कलम १४७ व १४९ नुसार २ वर्षे शिक्षा, व रू.१०००/- दंड, तसेच १४८ व १४९ नुसार ३ वर्षे शिक्षा व रू. १०००/- दंड, व भा.द.वि. कलम ५०४ व १४९ नुसार २ वर्षे शिक्षा व रू. १०००/- दंड, अशी एकूण ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, व एकूण रु.५०००/- दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे.
सरकार तर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रदीपकुमार धोडींबा रणधीर यांनी कामकाज पाहिले.