शिर्डी (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश येथील सोयाबीन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीसह अधिक चौकशी निमित्ताने शिर्डीत आलेल्या पोलीस पथकाला रात्री येथील एका हॉटेलमध्ये नजर चुकवून एका आरोपी पहाटे खिडकीतून पळून गेला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून त्यामुळे शिर्डी परीसरात खळबळ उडाली आहे
अधिक माहिती अशी की,
-लिमाचौहान जिल्हा राजगढ राज्य मध्यप्रदेश येथील सब इन्स्पेक्टर अनिल राहोरीया यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मी वरील ठिकाणी मी एक वर्षापासुन नेमणुकीस आहे . थाना पचोर जि. राजगढ मध्यप्रदेश गुन्हा रजिस्टर नंबर ४०६ /२०२४ ,३०३ (२ ) बी. एन. एस. या गुन्हयाचा सोयबिन चोरी चा तपास चालु असुन त्या तपासा साठी माझ्या सोबत पोलीस पथकातील कर्मचारी राहुल रघुवंशी अजय यादव खेमेन्द्रे खीची रवेन्द्र जाट रवि जाट असे पथका बरोबर गुन्हयातील आरोपी नामे मोहसिन खान उर्फ फिका खान रा. बालसमद थाना कसरवाडा आरिफ उर्फ रहीम खान रा. बालसमद थाना कसरवाडा
सोनु उर्फ नवाब खान रा. बलगांव थाना बलकवाडा सिंकदर उर्फ छोटा खान रा. बलगांव थाना बलकवाडा फरियाद उर्फ मंजुर खॉ रा यांच्यासह १७ नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश येथुन निघालो २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिर्डी येथे आलो व शिर्डी मध्ये इकबालभाई शेख रा. शिर्डी ता. राहाता
जि. आहिल्यानगर यांच्याकडे सोयाबिन चोरीची विचारपुस करून रात्री उशीर झाल्याने हॉटेल ड्रीम पॅलेस शिर्डी ता. राहाता जि. आहिल्यानगर येथे
थांबलो.दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सांय ५ वाजेच्या सुमा आम्ही शिर्डी येथील हॉटेल ड्रीम मध्ये . रुम नंबर २०३ मध्ये पोलीस अधिकारी अनिल राहोरिया, राहुल रघुवंशी अजय यादव असे होते आणि २०६ मध्ये पोलीस कर्मचारी खेमेन्द्रे खीची रवेन्द्र जाट टारवि जाट व त्याच्या सोबत आरोपी नामे 1) मोहसिन खान उर्फ फिका खान रा. बालसमद थाना कसरवाडा 2) आरिफ उर्फ रहीम खान रा. बालसमद थाना कसरवाडा 3) सोनु उर्फ नवाब खान रा. बलगांव थाना बलकवाडा 4) सिंकदर उर्फ छोटा खान रा. बलगांव थाना बलकवाडा 5) फरियाद उर्फ मंजुर खाँ रा. बालगाव
ठाणा बलकवाडा जि. खरगौन असे आरामसाठी थांबले असता त्यांच्या रुममध्ये सोबत असलेला आरोपी नामे फरियाद उर्फ मंजुर खाँ रा. बालगाव ठाणा बलकवाडा जि. खरगौन हा रुम नंबर २०६ मध्ये आमच्या अंमलदार यांची नजर चकवुन पहाटे ५ वाजेच्या सुमारास खिडकीतून पळून गेला आहे. आम्ही सदर पळून गेलेल्या आरोपीचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला पंरतु तो मिळून आला नाही म्हणून माझी आरोपी नामे फरियाद उर्फ मंजुर खॉ रा. बालगाव ठाणा बलकवाडा जि. खरगौन
यांच्याविरुध्द भारतीय न्यांय संहीता २०२३ चे कलम २६२ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर ६४२ /२०२४ भादवि कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.