लोहगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिवघेण्या गटारांचा प्रश्न ऐरणीवर
लोहगाव (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत नवीन जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे मात्र सदरचे काम अतिशय कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे
रस्ते तसेच अन्य विविध ठिकाणी गल्लीबोळांमध्ये जेसीबी ने खड्डे खोदून पाईप बसवण्याचे काम सुरू आहे मात्र सदरचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे खड्डे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना विशेषत महिला व लहान चिमुकल्यांना अतिशय धोकादायक हे खड्डे ठरत आहे याविषयी संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे जाणूनबूजून दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे. या कामाचे नियोजन नसल्याने व संथ गतीने हे काम सुरू असल्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या ग्रामपंचायत हद्दीत महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात असून या योजनेअंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी जेसीबी ने खड्डे खोदून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे . गावात अनेक ठिकाणी छोटे रस्ते, गल्लीबोळाआहेत . तेथे खोदाई करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . त्यामुळे अनेक भागात खड्डे खोदून ठेवले मात्र पुढील पाईप लाईन टाकून ते बुजवण्याचे काम लवकर होत नसल्यामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना येण्या-जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे .खड्डे खोदून ठेवले मात्र हे काम ताबडतोपीने करणे गरजेचे असताना ते होत नाही.त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.एखाद्या रुग्णांस दवाखान्यात न्यायचे ठरले तर रुग्णवाहिका रूग्णाच्या घरी पोहोचणे मुश्किल आहे. तसेच काम करताना जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन उन्हाळ्यात काही भागात पाणीपुरवठाही खंडीत झाला आहे कामाच्या दर्जाबाबतही जनतेतून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे
गत चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी नाही. येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी घरातून मुख्य डांबरी रस्त्यावर उचलून आणावे लागत आहे. लहान मुले या खड्ड्यात पडून किरकोळ जखमी होत आहेत. अशी परिस्थिती असताना हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या कामाकडे किंवा ठेकेदाराकडे कोणाचे लक्ष नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी ही त्याकडे कानाडोळा करीत आहेत. संबंधित प्रत्येक वार्डामध्ये हे काम सुरू आहे .व चार-पाच दिवसापासून अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे.मात्र तेथील ग्रामपंचायत सदस्य ही त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.
नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना ही चांगली गोष्ट आहे. मात्र हे काम तातडीने होणे गरजेचे आहे
संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे नागरिकांना या खोदून ठेवलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खड्ड्यांमुळे सध्या मोठा त्रास होत आहे . जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी ऐन उन्हाळ्यात मिळत नाही. त्यामुळे या नवीन पाईपलाईन चे काम त्वरित पूर्ण करावे. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला किंवा कर्मचाऱ्यांना तशी ताकीद द्यावी. अशी मागणी ही येथील ग्रामस्थ विशेषत महिला वर्गामधून होत आहे.