Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
अ.नगर

पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा संघ खा. निलेश लंके वारकरी समाजभूषण पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान

अकोले ( प्रतिनिधी) समाजासाठी जगणाऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होतं गोरगरिबांसाठी काम करणाऱ्यां महापुरुषांची जयंती साजरी होतात, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ आहे असे मत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री निलेश लंके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय वारकरी समाजभूषण पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात लंके बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे होते यावेळी शिवव्याख्याते प्रा प्रदीप कदम, पी आय गुलाबराव पाटील, पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, सागर शिंदे, राष्ट्रसेवा दलाचे राज्य सरचिटणीस विनय सावंत, जिल्हाध्यक्ष ऊत्तर सोमनाथ काळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते,सुभाष डोके, अली सय्यद, सुनिल गीते, राजेंद्र ऊकीर्डे, गडगे आदि उपस्थित होते.
सत्ता नसताना जर जनतेची कामे केली तर सत्ता गेल्यावर सुद्धा जनता डोक्यावर घेते परंतु राजकारणां त निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जाते. राजकारणात मते मिळेपर्यंत नेते मंडळी पाया पडतात लोटांगण घालतात आणि सत्ता मिळतात नागाचा फणा उभारतात अशांना सत्ता गेल्यावर जनता किंमत देत नाही असेही मत हा लंके यांनी व्यक्त केली
अनेक शिक्षक नोकरीला असताना काम करत नाही साहेबाला चार दिवस मॅनेज करतात आणि चार दिवस काम करतात ज्या शिक्षकांनी न शिकवतात पिढ्या बरबाद केल्या अशा शिक्षकांचे मुलं आज शेळ्या वळताना दिसत आहे अशी टीका त्यांनी शिक्षकांवर केली


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले की आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा साजरा केला जातो शिक्षकांनी आम्हाला घडवली त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम राज्यभर राबविले जातात.
शिवव्याख्याते प्रा प्रदीप कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांना फक्त सन्मानाबरोबरच आयुष्यात विचारांची सहली यावी म्हणून व्याख्यान आयोजित करण्याचा पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य असून समाजातील कर्तुत्वान व्यक्तींची दखल घेण्याचे कार्य पत्रकार संघ करीत आहे शिक्षक हा 24 तास शिक्षक असतो हा विचार नेहमी ठेवला पाहिजे. विचारांची मालिका विद्यार्थ्यांच्या डोक्यात कायम असते परंतु त्याची ठिणगी पेटवण्याचे काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं मत व्यक्त केले
पत्रकार संघाचा राज्यस्तरीय समाजभूषण वारकरी पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला. विणा, संत तुकाराम महाराज मूर्ती, तुकाराम महाराज पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह बुक्का लावून पुरस्कार देण्यात आला. आदर्श शेतकरी पुरस्कार शिवाजी नाईकवाडी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाधव सर यांना प्रदान करण्यात आला
कार्यक्रमात स्वागत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी तर प्रास्ताविक विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले.

सूत्रसंचालन दत्ता जाधव तर आभार हरिभाऊ फापाळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, वसंत सोनवणे, ललित मुतडक, अशोक शेळके, सहसचिव सचिन लगड, सरचिटणीस प्रविण धुमाळ, संघटक सुरेश देशमुख, सह संघटक दत्ता हासे, राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इले. मिडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मिडिया सचिव शुभम फापाळे, प्रसिद्धी प्रमुख दत्तु जाधव, राजेंद्र राठोड, सुनिल आरोटे, संपर्क प्रमुख संजय गायकर, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, खजिनदार भागवत खोल्लम, सोशल मिडिया प्रमुख सुनिल शेणकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सो.मि.प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले, रजिस्टार निखिल भांगरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते!


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉ. विश्वासराव आरोटे हे गरिबांसाठी काम करणारे आहेत 21 वर्ष गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा त्यांना वह्या दप्तर व शालेय उपयोगी साहित्य वाटप करतात दिवाळीत किराणा वाटप करतात हे गरिबांचे अश्रू पुसणारे व माणसात देव पाहणारी व्यक्ती आहे.
खा. निलेशजी लंके

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button