साईबाबा संस्थानच्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा मुलाचा पाय अधू करून गेला..!
साईबाबा संस्थानच्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा मुलाचा पाय अधू करून गेला..!
शिर्डी प्रतिनिधी/
पेट्रोल पंपावर शिर्डी येथे मंजुरी काम करत असलेल्या सचिन काळे यांचा ९ वर्षाचा मुलगा विराज काळे यास खेळत असताना बाॅल मुळे इजा झाली होती उपचारासाठी त्यास साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र वडील सचिन काळे यांचा आरोप आहे की उपचार दरम्यान संबंधित डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने मुलाचा एक पाय हालचाल करणे बंद झाला असून पंधरा दिवस झाले आहे साईबाबा सुपर हॉस्पिटलची चुक असताना उपचारासाठी सहकार्य सुद्धा केले जात नसुन एकमेकावर जवाबदारी ढकलत असल्याने मुलाच्या चितेत वाढ होत असल्याने न्याय मिळावा अशी मागणी सचिन काळे यांनी केली आहे जे दोषी आहे त्या संबंधित डॉक्टर,नर्सेस यांच्यावर कारवाई व्हावी आणि पुढील उपचारार्थ खाजगी दवाखान्यात न्यावे लागणार असल्याने तेथील खर्च करण्याची माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने साईबाबा संस्थान हॉस्पिटलने पुढील उपचाराचा खर्च करावा यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी रुग्णाचे वडील सचिन काळे यांनी केली या चौकशी साठी समिती स्थापन केली आहे मात्र कधी चौकशी होईल कधी न्याय मिळेल तो पर्यंत माझ्या मुलाच्या जीवनाशी खेळु नका अशी आर्त हाक मुलाच्या आईची आहे
ह्याबाबत चौकशीसाठी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक ओक यांनी समिती स्थापन केली असून समितीच्या अहवालात ज्याची कोणाची चूक दिसेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच आम्ही रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाला आमच्या अधिकारात आहे ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली असून त्यांनी केलेल्या मागण्या आम्ही वरिष्ठांकडे पाठवून या प्रकरणात लवकर कसा दिलासा आणि मदत मिळेल याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. चूक कोणाची यापेक्षा रुग्णाला सध्या ज्या उपचारांची गरज आहे ते तज्ञ डॉक्टर साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नाहीत तसेच डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक तक्रारी येत असतात याआधीही नगरपरिषद मधील कर्मचारी गायकवाड यांच्या मुलाच्या बाबतीत देखील असा प्रकार घडला होता तेव्हा देखील डॉक्टरांच्या चुकीने सदर व्यक्तीला मोठा शारीरिक,मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला होता परंतु फक्त संस्थान संचालित हॉस्पिटल आहे हॉस्पिटलची म्हणजेच साईबाबांची आणि पर्यायाने शिर्डीची बदनामी होत असल्याची भावना असल्याने अनेकदा प्रसार माध्यमे आणि ग्रामस्थ देखील हॉस्पिटल मधील अनागोंदी कारभारावर मौन बाळगतात परंतु येथील रुग्णालय अधीक्षक हे उच्चशिक्षित आणि शिस्तप्रिय असताना आपल्या अधिपत्याखालील रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची भनक त्यांना नसावी का..? असा सवाल देखील विचारला जात आहे
घडलेल्या प्रकरणात अधिकारी वर्गाने वरिष्ठ आणि नियमांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकने योग्य नसून असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत रुग्ण व नातेवाईकांनी व्यक्त केले असले तरी मात्र साईबाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर का टिकत नाही यासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापना करून रुग्णाच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा आणि तज्ञ् डॉक्टरांची लवकरात लवकर भरती करावी मागणी पुढे आली आहे