दीव्यांग दांपत्याचा मोबाईल खिशातून सफाईदारपणे काढत लहान मुलगा पसार

वेळ रात्री 9 ते सव्वा नऊ च्या दरम्यानची साई बाबांची चावडी मंदिर बंद झाल्यानंतर चावडी समोर काही भाविक आपल्या कुटुंबासोबत निवांत बसलेले तर काही भाविक समोर असलेल्या दुकानांमध्ये खरेदी करत होते याचदरम्यान कोणी भाविक आपल्या जवळील प्रसाद इतर भाविकांना देत असताना तेथेच अगरबत्तीचा व्यवसाय करणारे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले दीव्यांग जोडपे हे देखील आपला व्यवसाय करत होते प्रसाद वाटत असलेल्या भाविकाने थोडीफार गर्दी असताना त्यांना देखील हातात प्रसाद दिला नेमक्या त्याचवेळी डाव साधत एका लहान मुलाने त्या अंध व्यक्तीच्या खिशात अलगद हात घालून त्याचा मोबाईल काढला अन् काही कळण्याच्या आत तेथून पळ काढला अचानक झालेल्या ह्या प्रकाराने उपस्थितांना डोळे असताना देखील काय झाले हे कळाले नाही मात्र अंध व्यक्तीला चटकन घडला प्रकार लक्षात आला आणि त्याने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली मात्र तोवर तो मुलगा मोबाईल घेऊन पसार झाला होता सदर प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अस्पष्ट जरी असला तरी मोबाईल घेऊन पळताना तो मुलगा दिसून येत आहे.
यानंतर आजूबाजूच्या दुकानदारांनी त्या अंध दाम्पत्याला धीर दिला व शिर्डी पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार करण्याचा सल्ला दिला मोबाईल घेऊन पळालेला मुलगा अगदी 10 ते 11 वर्षांचा दिसत असून साई मंदिराच्या आसपास गंध लावणे,फोटो विकणे असे व्यवसाय करणारे अनेकजण नेहमी दिसून येतात.. कमी वयात जास्त पैसा हातात आल्याने अनेकांना नशेची लत लागली असून अगदी चिमुकली 5 वर्षांची मुले आडोश्याला जाऊन सिगारेट पित असल्याचे अनेकदा दिसून येते…तर चक्क 10 वर्षांच्या मुलांना दारू,गांजा, व्हाइटनर अश्या विविध प्रकारच्या नशा करण्याच्या सवयी लागल्या आहेत त्यातीलच एक हा मोबाईल घेऊन पळालेला मुलगा असल्याचे काहींनी सांगितले मात्र या परिसरात असलेले सुरक्षा रक्षक फक्त शोभेचे बाहुले आहेत का..? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलं आहे
ह्याबाबत पोलिस प्रशासन,साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग तसेच नगरपरिषद या सर्वांना माहिती असून वेळोवेळी याबाबत प्रसारमाध्यमांनी देखील आवाज उठवला आहे मात्र प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे की अन्य काही याबाबत साशंकता आहे मात्र थेट साई मंदिराच्या 3 नंबर गेट च्या प्रवेशद्वारावर एन्ट्री मारत काहीजण फोटो,मूर्ती विक्री करत सुरक्षा रक्षकांना देखील जुमानत नसल्याने किंवा काहीजण नशेत असल्याने सुरक्षा रक्षकांना त्यांची भीती आहे की काय…? आणि साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी याकडे लक्ष कधी देणार असा सवाल देखील आता विचारला जात आहे