शिर्डी (प्रतिनिधी)
औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सरला बेट हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. गोदावरी नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला हा भुप्रदेश निसर्गप्रेमींसाठी वरदान ठरला आहे.
त्यामुळे सरला बेटाला केवळ धार्मिक स्थळ म्हणुनच नाही तर एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणुन अनन्यसाधारण महत्व आहे. अशा या सरला बेट आश्रमाचे महंत गुरुवर्य हिंदू हृदय सम्राट स्वामी रामगिरीजी महाराज यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त त्यांचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी अभिष्टचिंतन केले आहे.
कमलाकर कोते यांनी म्हटले आहे की, मंहत रामगिरीजी महाराज यांनी संत गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ची परंपरा मोठ्या उत्साहात व अध्यात्मिक ज्ञानदान करत सुरू ठेवली आहे.
वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगावचे भुमिपूत्र सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोदावरी नदीकाठी सराला बेटाचा विकास केला.
सामाजिक व धार्मिक कार्याचा वसा हाती घेतलेल्या वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांचे आजोबा रुपचंदशेठ संचेती यांनी गोदावरी नदीकाठची ६५ एकराचा सुपिक भूभाग गंगागिरी महाराजांना भेट दिला. वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारेतून निजामशाहीच्या जुलमी राजवटीत अन्यायाची वेदना सोसणाऱ्या लोकांना संघटित करण्या गंगागिरी महाजारांनी लोकसहभागातून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली.
व्यसन मुक्त समाज, अस्पृश्य निर्मलून कार्यक्रम, विविध गावातून भाकरी जमा करून त्या एकत्रित केल्या जातात. आमटी व भाकरी पंगत ही सप्ताहामधील अन्नदानाचा प्रमुख आहार असतो. पावणे दोनशे वर्षपूर्तीच्या दिशेने सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. स्व.नारायण गिरी महाराज यांनी सराला बेटाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली. त्याच्यानंतर मंहत रामगिरी महाराज यांनी सराला बेटात त्यांच्या भव्य समाधी स्थळाची उभारणी केली.
गंगागिरी महाराजांसह इतर महंतांचेही समाधी मंदिर बेटावर आहेत. मराठवाडा व नगरसह आजुबाजूच्या जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड यांनी सप्ताहाची दखल घेण्यात आली आहे. अशा हिंदुरुदय सम्राट स्वामी रामगिरीजी महाराज यांचा आज जन्मदिन आहे. संत ,महंत ,ऋषी यांचे कुळ,मुळ पहिले जात नाही .
मात्र संत रामगिरीजी महाराज हे महंत असले तरी ते सर्व सामान्य माणसांमध्ये मिसळणारे एक संत आहेत म्हणूनच त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन आहे . असे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे.