राहता येथे हिंदू बहुजन समाज मेळाव्याचे नियोजन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे आमदार श्री योगेश अण्णा टिळेकर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे महसूल पशुसंवर्धन व बुद्ध विकास तसेच अहमदनगर व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे होते.
कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर आहिल्या नगरचे सरचिटणीस श्री नितीन राव कापसे पाटील मुकुंदराव सदाफळ रघुनाथ बोटे कैलास सदाफळ श्री सौरभ कोळपकर प्रवरा कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे श्री आप्पासाहेब चव्हाण खंडेराव कडलग बबनराव वालझडे
मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर अभय शेळके नितीनकोते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हजारो ओबीसी कार्यकर्त्यांच्या समवेत मोठ्या जल्लोषात कार्यक्रम पार पडला. यावेळी महसूल व पालकमंत्री विखे साहेबांच्या नावाने मोठ्या जल्लोषात घोषणा देण्यात आल्या.