इंडियन बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
साईबाबांच्या पावन नगरीत प्रथमच इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन च्या माध्यमातून 64 वी भव्य वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न झाली
स्पर्धेसाठी 28 राज्य व स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय 325 खेळाडू व 125 पदाधिकारी उपस्थित होते तर इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व डॉ संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डीतील उद्योजक संदीप सोनवणे यांच्या अनमोल सहकार्याने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी संत नवनाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले
याप्रसंगी भारतीय आशियायी व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे,आयोजन समितीचे संदीप सोनवणे, ॲड.प्रमोद दादा जगताप,उच्च न्यायालयाचे ॲड. ज्ञानेश्वर काळे,राष्ट्रीय संघटनेचे कोषाध्यक्ष राजेश सावंत,महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसीएशनचे नंदू खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे दीपप्रज्वलन बजरंगबली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झाले
याप्रसंगी मदन कडू,राजेंद्र सातपूरकर,सुनील शेगडे,राजेश सावंत,नारायण पाडेकर,महेश गोसावी,बापू काळे,संजय सुरवसे,मनोज गायकवाड,सोहेल शेख, तसेच राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडीलकर,सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार,मंदिर संरक्षक विभागाचे रोहिदास माळी , शिर्डी पो.स्टेशनचे पो.नि. रामकृष्ण कुंभार आदीसह पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक क्रिडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
या स्पर्धेत आलेल्या स्पर्धकांनी थरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सेना दलाचा रॉबी मेथीई हा ठरला त्यास 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले तर स्पर्धेत सहभागी सेनादल, व राज्यातील दर्जेदार खेळाडूंच्या दमदार पिळदार शरीरयष्टीचा उपस्थितांनी थरार अनुभवलाय..
इतर 17 अन्य वजनी गटांमध्ये प्रत्येकी अनुक्रमे 6,अनुक्रमे 15 हजार,,10 हजार,7 हजार,5 हजार व तीन हजार अशी रोख बक्षिसे पटकावली एकूण संपूर्ण स्पर्धेत 15 लाखांची बक्षिसे देण्यात आली तर संपूर्ण स्पर्धेसाठी जवळजवळ 50 लाख रुपये आयोजनाचा खर्च आला आहे..