Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
अ.नगरराजकीय

मी अल्पसंख्य असल्याने पक्षाने तिकीट नाकारले -डॉ.राजेंद्र पिपाडा

शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात ऑटो रिक्षा चिन्हावर उभे असलेले अपक्ष उमेदवार राजेंद्र पिपाडा यांची जाहीर सभा काल राहता येथील वीरभद्र मंदिरासमोरील न.पा.प्रांगणात संपन्न झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हजारो मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मराठी बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दराडे यांच्या तुफान फटकेबाजीने, डॉ. पिपाडा यांच्या भावनिक आवाहनाने, ॲड. संदीप चिमटे यांच्या “नवे पर्व-ओबीसी सर्व” या नाऱ्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी इतिहास घडणार असून घराणेशाहीची भाकरी फिरविली जाऊन परिवर्तन घडणार हे निश्चित झाले.


सौ.वंदना अभयजी पिपाडा, आकाश बाफना आणि अॅड. संदीप चिमटे यांच्या नंतर शिर्डी विधानसभा मतदार संघातील मुलुख मैदानी तोफ आणि विखे यांच्या एक केंद्रीय नेतृत्वाला खंबीर विरोध करणारा एकमेव नेता म्हणून ओळख असलेले डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी त्यांना अपक्ष उमेदवारी का लढवावी लागत आहे, याचे पडद्यामगिल राजकारण आणि घटनाक्रम उलगडून सांगितला.


भारतीय जनता पक्षामध्ये 2019 सालच्या निवडणुकीच्या 2-3 महिने आधी प्रवेश विखे यांनी प्रवेश केल्याने मला उभे राहाता आले नव्हते. मात्र, आम्ही एकाच पक्षात असतांनाही आणि माझी पत्नी राहाता नगर पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा असतांनाही विखे यांनी त्यांना अपात्र ठरविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, हे सांगत पिपाडा यांनी स्पष्ट केले की माझ्या नंतर भाजपात येऊनही विखे माझीच राजकीय कोंडी करत होते.

जवळच्या कार्यकर्त्यांना माझे विरोधात उचकवून माझ्या वयस्कर वाडिलांविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार द्यायला सांगणे, औरंगाबाद येथील मी ओळखतही नसलेल्या दलित बांधवला माझे विरुद्ध ॲट्रॉसिटी ची कम्प्लेंट दिली. असे एक ना अनेक प्रकारे त्यांनी माझे राजकारण खलास करण्याचे प्रयत्न केले. भारतीय जनता पक्षात येऊन दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयार होऊ दिले नाही. त्यामुळे मी दुसऱ्या पक्षात जाणे किंवा अपक्ष याशिवाय माझ्यापुढे पर्याय उरला नव्हता.

मी महाविकास आघाडीच्या आणि माझे चांगले मित्र असलेल्या नामदार बाळासाहेब थोरात यांचे कडे देखील विधानसभेची उमेदवारी मागितली होती. विखे असो किंवा थोरात साहेब असो हे दोन्हीही मराठा समाजाचे नगर जिल्ह्यातले रहिवासी असलेले राज्याचे मातब्बर पुढारी आहेत.

त्यांच्याकडेच त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म संबंधित उमेदवाराला वाटप करण्याचे अधिकार असतानाही कदाचित मी अल्पसंख्याक समाजाचा असल्याने त्यांनी मला तिकीट दिले नसावे आणि त्यांच्या समाज भगिनीला प्राधान्य दिले असले तरी माझी खरी भिस्त शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनता दलित मुस्लिम अल्पसंख्याक बांधव आणि ओबीसी मतदार यांचेवर असून मराठा समाजातीलही अनेक हितचिंतक मला मतदान करून यावेळी परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास डॉक्टर पिपाडा यांनी व्यक्त केला.


राहाता नगरपालिकेत माझी पत्नी सो ममता पिपाडा यांना दोन वेळेस लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आम्ही राहता येथील प्राचीन वीरभद्र मंदिरासमोरील अतिक्रमण काढून प्रशस्त प्रांगण आणि रस्त्याची निर्मिती अतिशय सुंदर आणि सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जॉगिंग ट्रॅक आणि अहिल्यादेवी होळकर जॉगिंग ट्रॅक उद्यान सुशोभीकरण असे अनेक लोकहिताचे उपक्रम यशस्वी करून दाखविले.

इतकेच काय विखे यांनी 1999 मध्ये राहता येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याची घोषणा केली होती मात्र माझी पत्नी सन 2001 मध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही राहाता नगरपालिकेमार्फत रीतसर टेंडर काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आणला. मात्र त्याचे श्रेय आम्हाला जाईल या भीतीपोटी विखेंनी एन केन प्रकारे आज 2024 पर्यंत ही त्याची स्थापना होऊ दिलेली नाही.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर ते आपले दैवत असल्याचा दावा भारतीय जनता पक्ष आणि मराठा समाज करत आले आहेत त्यांनीच अशाप्रकारे छत्रपतींचा पुतळा गोडाऊनमध्ये बंद करून दाबून ठेवणे योग्य आहे का असा खडा सवाल डॉक्टर पिपाडा यांनी यावेळी उपस्थित करून विखेंनी प्रचंड कोंडी केल्यामुळेच मला अपक्ष उमेदवारी लढवावी लागत आहे हे स्पष्ट केले.
मी मॅनेज होणार नसल्याने विरोधक खोट्या अफवा पसरवीत आहेत.

तरी मतदारांनी अफवा, बदनामी, दहशत याचा विचार न करता मोकळेपणाने मला मतदान करुन सेवेची संधी द्या, मी कोणत्याही तक्रारीला जागा ठेवणार नाही असे सर्व उपस्थितांना साष्टांग दंडवत घालून डॉ. राजुभाऊ पिपाडा यांनी भावनिक आवाहन केल्याने येत्या 23 तारखेला विजयाचा गुलाल त्यांच्या अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांचेवरच उधळल्या जाईल अशी मतदारांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button