महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी राहाता तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. या वेळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुजय विखे यांच्याकडून बेताल वक्तव्य केले जात असून त्या काहीच तथ्य नसते. परंतु त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होत असल्याच्या बाबी अनेकांनी घोगरे यांच्या निदर्शात आणून दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
घोगरे म्हणाल्या, निवडणुका या आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामावर तसेच येणार्या काळात काय कामे करणार आहे, या मुद्दांवर होत असतात. परंतु संगमनेर व राहाता तालुक्यातील सभांमध्ये माजी खासदार सुजय विखे हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याने तरुणांसह कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा आम्ही त्यांना जशाच तसे भाषणातून उत्तरे देऊ, असा इशारा घोगरे यांनी दिला आहे.
घोगरे म्हणाल्या की, विखे कुटुंबावर आम्हाला बोलण्याची इच्छाही नाही. पण सुजय विखे यांच्या बेताल वक्तव्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे. विखे कुटुंबाचे राजकारण हे आता संपत आलेले असून ते संपविण्यासाठी सुजय विखे असल्यानंतर दुसरी कोणाची गरज नाही. सुजय विखेच विखे घराण्याचे राजकारण बेताल वक्तव्याने संविणार आहे. हे सांगण्याची कोणा भविषगाराची गरज नाही, असे घोगरे म्हणाल्या.