शिर्डी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा नुकत्याच पार पडल्या त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे आता परत एकदा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तसेच महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्येही आता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने वाट पाहू लागले आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महामंडळे संस्था ट्रस्ट यामध्ये आपल्याला पद मिळू शकेल अशी आशा माहितीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी येथील श्री साई संस्थान विश्वस्त मंडळाची ही नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे व या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी कोपरगाव चे विवेक कोल्हे यांची वर्णी लागण्याची शक्यता बोलली जात आहे.
कारण या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आशुतोष काळे यांच्या विरोधात विवेक कोल्हे उभे ठाकण्याची शक्यता होती.मात्र त्यांना भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकांनी मुंबई व दिल्ली येथे बोलावून त्यांचे समजूत घातली त्यामुळे विवेक कोल्हे हे भाजपातच थांबून राहिले व त्यांनी महायुतीचा प्रचारही मनापासून केला त्यामुळे त्यांना नक्कीच संस्थांनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची शक्यता चर्चेत आहे.
देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानवर लवकरच विश्वस्त मंडळ येईल असं वक्तव्य दोन दिवसापूर्वी भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने शिर्डीतील एका खाजगी भेटी दरम्यान बोलून दाखवले आहे. त्यानंतर राज्यात आता भाजपा महायुतीचे सरकार आल्याने साई संस्थानवर राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.
दरम्यान श्रद्धा सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या साईसंस्थान स्थापनेला शंभर वर्षे
पूर्ण झाली आहे. दरम्यान २०१२ पासून ते २०२४ या १२ वर्षाच्या कालावधीत २०१८ शताब्दी वर्षात भाजप सेना युतीच्या सरकारमध्ये तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या विश्वस्त मंडळाला जेमतेम ३ वर्ष आणी २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांच्या विश्वस्त मंडळाने दिड वर्ष असा कामकाज करायला वेळ मिळाला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेता आले नाही.
हावरे यांच्या कार्यकाळात मोठं मोठया घोषणा झाल्या परंतु त्या सत्यात उतरल्याचे आतापर्यंत दिसून आले नाही.
दोन्ही विश्वस्त मंडळाचा हा चार साडेचार वर्षांचा कालावधी वगळलातर आतापर्यंत साईबाबा संस्थानवर तदर्थ समितीच्या वतीने त्रिसदस्यसमिती संस्थानचे कामकाज बघत आहे. राज्यात नुकत्याच पारपडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना महायुतीला जनतेने भरभरून मते देऊन सत्तेत महायुतीचे सरकार आणले आहे.
मागील अडीच वर्षाच्या कालखंडात महायुती सरकार असतांना साई संस्थानवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती
होणे अपेक्षित होते मात्र तसे काही झाले नाही. त्याबरोबरच एस टी महामंडळ वगळता इतर महामंडळावर ही नव्याने निवड झाली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानवर राज्यासह नगर जिल्ह्यातून साईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागते हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे. सन १९२२
साली साईसंस्थान स्थापनेवेळी विश्वस्त मंडळात एकुण १५ सदस्य होते.तर भक्त मंडळात २३२ सदस्यांचा समावेश होता.
त्यावेळी संस्थानकडे स्थापनेवेळी केवळ २ हजार २३८ रुपये होते. आज मात्र शंभर वर्षात २ हजार २०० कोटींहून अधिक ठेवी, ४५० किलो सोने, साडेपाच हजार किलो चांदी तर १० कोटींचे मौल्यवान हिरे एवढी संपत्ती आहे. आता राज्यात स्थिर सरकार आल्याने साई संस्थानवर प्रलंबित असलेल्या विश्वस्त मंडळाचा तिढा सुटेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य मिळेल असेही सूत्रांकडून समजले आहे. आता महायुतीचे सरकार आले आहे त्यामुळे साई भक्त, ग्रामस्थ यांच्यामध्ये शिर्डीला साई संस्थान वर विश्वस्त मंडळ लवकरच नियुक्त होईल अशी आशा निर्माण झाली आहे.