अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू
आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत असून, या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होणार आहे.
याशिवायही देशात आणि राज्यात विविध घडामोडीसुद्धा सुरु असणार असून लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्य़ांनी संसदीय कामकाज सुरु होण्यापूर्वी देशाला चांगल्या विरोधकांची अपेक्षा आहे…
असं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी आणीबाणीची आठवण काढत 25 जून हा दिवस कोणीही विसरू शकत नाही, आणीबाणी हा देशावरचा काळा डाग आहे, असं म्हटलं. यापूर्वीपेक्षा आपण तिपटीनं जास्त काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी देशातील जनतेला दिला. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकावर निशाणा साधला आहे.
“आता ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो. विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल. 240 चे 275 होतील हे कळणार सुद्धा नाही,” असं राऊत म्हणाले. तसेच, “आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी शाह यांचा आवाज चालणार नाही,” असंही राऊत म्हणाले.