महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर राजभवनवर आयोजित करण्यात आला. शपथविधीसह चर्तेत आलाय तो मंत्रीपदासाठीचा फॉर्म्युला. अडीच वर्षानंतर मंत्रीपद साडवे लागले अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेतले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या फॉर्म्युलासाठी तयार आहेत.
शिवसेनेचे ११ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याआधी या आमदारांच्या स्वाक्षऱ्या प्रतिज्ञापत्रावर घेण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून अडीच वर्षे मंत्रिपदं दिली जाणार आहेत. अडीच वर्षांनंतर मंत्रिपदावरुन पायउतार होऊ, असं सगळ्या भावी आमदारांकडून लिहून घेण्यात येत आहे. होऊ घातलेल्या मंत्र्यांच्या सह्या शपथपत्रांवर घेण्यात येणार आहेत
.1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
2) राधाकृष्ण विखे, भाजपा
3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
4) चंद्रकांत पाटील, भाजपा
5) गिरीश महाजन, भाजपा
6) गुलाबराव पाटील, शिवसेना
7) गणेश नाईक, भाजपा
8) दादा भुसे, शिवसेना
9) संजय राठोड, शिवसेना
10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
11) मंगलप्रभात लोढा, भाजपा
12) उदय सामंत, शिवसेना
13) जयकुमार रावल, भाजपा
14) पंकजा मुंडे, भाजपा
15) अतुल सावे, भाजपा
16) अशोक उईके, भाजपा
17) शंभूराज देसाई, शिवसेना
18) आशिष शेलार, भाजपा
19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
22) माणिकराव कोकाटे, भाजपा
23) जयकुमार गोरे, भाजपा
24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
25) संजय सावकारे, भाजपा,
26) संजय शिरसाट – शिवसेना
27) प्रताप सरनाईक, शिवसेना
आतापर्यंत अपडेट झालेले नावे आहेत