Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
अ.नगरराजकीय

आपला पक्ष पळवला आपला चिन्ह पळवला इतकेच काय आपलें बाप पळवले 

They ran away from their party, they ran away from their symbol, they also ran away from their father

राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन हा तुमचा हक्क असून आपण सत्तेत आल्यावर ही योजना अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी कोपरगाव येथे एका अधिवेशन बोलताना दिले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन कोपरगाव बेट येथे आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,खा.सुभाष देसाई,खा.संजय राऊत,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,खा.भाऊसाहेब वाकचौरे,मिलिंद नार्वेकर,आ.सत्यजीत तांबे,आ.मदारी,आशुतोष चौधरी,

kamlakar


संघटनेचे राज्याध्यक्ष विकास खांडेकर,संघटनेचे सचिव आशुतोष चौधरी,श्री उगले,आ.सुधाकर अडबले,सुनील दुबे,शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर,आदींसह मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे ते आमचे कर्तव्य आहे.राज्यात आम्ही अनेक जनकल्यानाच्या योजना राबवल्या आहेत.त्याही यशस्वीपणे राबवल्या आहेत.आम्ही शब्दाचे पक्के आहे.त्यात बदल होणार नाही.मात्र देशाच्या अर्थमंत्री जुनी पेन्शन लागू करणार नाही असे भारतीय संसदेत सांगतात.त्यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त करणार.


त्यावेळी त्यांनी,”आपला पक्ष बळकावला पक्षचिन्ह पळवले,एवढेच नव्हे तर आपले बाप पळवले असल्याचा आरोप करून त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या,” दीवार ‘ या चित्रपटातील संवाद,”मेरे पास मां है” हा संवाद ऐकवला व आमच्या कडे इमान असल्याचे सांगून तुमच्या बळावर आम्ही नक्की सत्तेत येऊ.या वर्तमान मिंधे सरकारला पेंशनवर पाठवायला हवे असे आवाहन करून,कर्मचाऱ्यांनी,”

तुम्ही उपोषण करू नका”आम्ही तुमची ही योजना अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही.ज्यांना लाडकी बहिण,लाडका भाऊ माहीत नव्हता तो आगामी निवडणूक पाहून त्यांना तुमची पेन्शन दिसू लागेल असा इशारा दिला आहे.आगामी काळात ते आश्वासन देतील.त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का ? असा सवाल केला आहे. त्यावेळी उपस्थितांनी नकार दिला आहे.महाराष्ट्रीय माणूस माझा आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर कामगारांसाठी लढा दिला आहे.त्याला न्याय देणार आहे.माझे सहकारी माझी सत्ता आहे.राजकीय नेते कंत्राटी कामगार आहे.तुम्ही कायम कामगार आहे.कोरोना काळात तुम्ही घराच्या बाहेर पडला नसता तर कोरोणा संपला नसता.सत्तेतील सगळे फुकट खाऊ आहे.राज्य चालवणारे तुम्ही आहे.

हे सरकार तुमच्या कामाचे श्रेय घेतात.राज्यात आगामी निवडणुकीत आपलं सरकार आणा आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू.निवडणुकीत तुम्ही सरकार बदलण्याचा निर्धार करा व हे सरकार बदलून दाखवा व जशीच्या तशी लागू करू असे आश्वासन शेवटी दिले आहे.

त्यावेळी नाना पटोले म्हणाले की,”शिर्डीत हे अधिवेशन होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले आहे असल्याचा दावा करून कोपरगाव बेट हे साईबाबांची तपोभूमी असल्याचे सांगून तुम्हाला साईबाबा नक्की न्याय देतील असा विश्वास दिला आहे.

तुम्हाला पंतप्रधान म्हणतात नव्या पेन्शन वर कर्मचारी खुश असल्याची बतावणी केली आहे.पंतप्रधान खरे बोलणारे आहे का ? असा सवाल उपस्थितांना केला आहे अनिल अंबानी यांना एक हजार ६०० कोटींचे कर्ज माफ केले असल्याचे सांगून हे सरकार लाडक्या बहिणींना दिड हजार देते

तर त्याची जाहिरात करते.मात्र एका उद्योजकांचे ०१ हजार ६०० कोटी माफ करूनही जाहीर केले नाही”असा आरोप केला आहे.पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुलींना मोफत बस चालू केली ती योजना आजही सुरू आहे.आमचे सरकार राज्यात सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेट मध्ये तुमची मागणी मान्य करू असे आश्र्वासन दिले आहे.पेंशनला टेन्शन देणारा माणूस त्याला कुबुद्धि झाली

तो तिकडे भाजप महायुतीत गेल्याने टेन्शन गेले असल्याने आमचे सरकार आल्यावर ही योजना मंजूर केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
त्यावेळी त्यांनी समृध्दीवर खूप अपघात झाले त्यात १० हजार लोक मृत्यू पावले असल्याचा दावा केला आहे.या समृध्दी वर भाजप नेत्यांची समृध्दी झाली असल्याचा आरोप शेवटी केला आहे.

खा.संजय राऊत म्हणाले की,”पंतप्रधान यांना पेन्शन अदाणी कडून येते त्यांना पेन्शनची गरज नाही.कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमची पेन्शन हिसकावून घेईल.आपला भविष्यातील मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित आहे.त्याचा फायदा तुम्हाला आगामी काळात मिळणार आहे.

सेनेचे सचिव खा.सुभाष देसाई यावेळी म्हणाले की,”हे लोक जुने तेच मागत आहे.वेतन आणि पेंशन हा प्रत्येकाचा अधिकार आहे.आयुष्याच्या शेवटी माझ्या कामाचा मोबदला मिळावा व अपत्याकडे काही मागायची वेळ येऊ नये अशी मागणी वावगी किंवा वेगळी नाही.लोकप्रतिनिधींना पेन्शन मिळते.मी सातवेळा आमदार होतो.

उध्दव ठाकरे यांनी मला नंतर संधी दिली.मला ८४ हजार रुपये पेन्शन मिळते.मग अन्य लोकांना का नको.वर्तमान सरकार रिक्षांची तीन चाके सी आहे.यातील मुख्यमंत्री नोव्हेंबर रोजी निवृत्ती घेणार आहे त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवाभाऊ,अजित पवार सेवानिवृत्त होतील.

खासदार आमदार पेन्शन मागत असतील तर वावगे नाही.ही मागणी न्याय आहे.तुम्ही एकजूट दाखवली तर काय होते.हे तुम्हाला सांगायची गरज नाही.मे महिन्यात तुम्ही तुमची ताकद दाखवून दिली आहे.तुम्ही महाआघाडीला मतदान देणार आहे.
राज्यात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे.

सदर प्रसंगी विकास खांडेकर म्हणाले की,”या लोकाना जुनी पेन्शन पाहिजे.१९८२ ची जुनी पेंशन हवी आहे.त्यासाठी जो जुनी पेन्शन देईल त्यालाच मते दिले जाईल.राज्यातील १८ लाख मतदार त्यांचे चार मतदान दिले तर काय होईल याचा अंदाज येईल.

हिमाचल मध्ये जुनी पेंशन दिली नाही तेंव्हा येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना पेंशनवर पाठवले असल्याची आठवण दिली आहे.नव्या मुख्यमंत्र्यांनी पाहिल्याच कॅबिनेट मध्ये जुनी पेंशन लागू केली आहे.उध्दव साहेब तुम्ही तुम्ही सुद्धा ती लागू करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

त्यावेळी रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.तर प्रास्ताविक संघटनेचे सचिव गोविंद उगले यांनी केले त्यात त्यांनी जुनी पेन्शन पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर करणार असेल तर आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ असे सांगितले आहे.

सदर प्रसंगी उध्दव ठाकरे यांनी,”कोपरगाव पाच क्रमांकाचे तलावाचे भूमिपूजन होत आहे.त्यावेळी मी १३१.३४ लाखांचे मंजुरी दिली होती.त्याचे श्रेय आज भलतेच घेत असल्याचा शाळजोडा त्यांनी लगावला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button