शिर्डी( प्रतिनिधी )शिर्डी शहरात जे साईभक्त मोठ्या प्रमाणावर येतात. त्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर असतात .हे भाविक आरती व साई दर्शनासाठी दोन-तीन दिवस थांबत देखील असतात .परंतु परराज्यातील हे भाविक सध्या दुचाकी वरील धूमस्टाइल्स सह इतर चोरट्यांच्या रडारवर असून दुचाकीवरून धुमस्टाईल चोरीच्या अधुन मधुन घटना घडत असतात. मात्र पायी चालत पाठीमागून येऊन अचानक गळ्यातील सोने घेऊन पळून जाण्याची घटना
१७ नोव्हेंबर रोजी साई मंदिरात परिसरातील एका गल्लीत घडली असून गोटला भारती किशोर वय ५५ राहणार चिट्टीनगर विजयवाडा शहर आंध्रप्रदेश ही महिला कुटुंबासह साई दर्शनासाठी आली होती. १७ नोव्हेंबर रोजी दर्शन आरती होऊन सकाळी६, ३० वाजेच्या सुमारास बाहेर परतीच्या प्रवासासाठी पायी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या एका इसमाने माझ्या गळ्यातील सोन्याची चैन ओरबडून नेण्याचा प्रयत्न केला मी देखील जोरदार प्रतिकार केला असता
सोन्याचा काही अर्धा भाग माझ्या हातात तर अर्धा भाग अंदाजे ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन किंमत सरकारी भाव प्रमाणे एक लाख वीस हजार तर आजच्या भावाप्रमाणे सव्वा दोन लाख रुपये किंमतीची सोन्याच्या चैनचा अर्धा भाग चोरून नेल्याची माझी अज्ञात इस्मविरुद्ध तक्रार असल्याची फिर्याद शिर्डी पोलिसात दाखल केल्याने
शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बी एन एस ह२०२३, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत असून पहाटेच्या वेळी साईभक्त आरती दर्शन साठी येत असल्याने शिर्डी पोलीसांनी गस्त वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे .
ज्या परीसरात हि घटना घडली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारु ,नशेचे साहित्य विक्री होत असल्याने भिक्षेकरी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला असून ठोस उपाययोजना करावी . अशी मागणी होत आहे.