डॉक्टर प्रितम वडगावे यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना दैनिक साई दर्शन परिवारातर्फे प्रत्यक्ष भेटून शाल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. व पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन रुग्णांची, जनतेची अशीच अधिक अधिक सेवा करण्याची संधी अधिक अधिक वर्ष त्यांना मिळो अशी साई चरणी प्रार्थना करण्यात आली. दैनिक साईदर्शनचे संस्थापक संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी, यांनी डॉक्टर प्रीतम वडगावे यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करण्यात केला.
श्री साईबाबा मुळे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. येथील श्री साईबाबा संस्थान हे तिरुपती नंतर देशातील दोन नंबरचे श्रीमंत व जगप्रसिद्ध देवस्थान समजले जाते. अशा या तीर्थस्थानी असणाऱ्या साई संस्थांनच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक म्हणून डॉक्टर प्रीतम वडगावे येथे गेल्या वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही रुग्ण उपचारासाठी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी साईबाबांवर श्रद्धा व सबुरी ठेवून येत असतात. अशा सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना धीर देणे, संयमाने बोलणे हे महत्त्वाचे ठरते. व हे काम डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी आपणासह आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोणीही गर्दीमुळे मंदिरात जाऊ शकला नाही तर कळसाचे दर्शन घेऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन समाधान पावू शकतो.
प्रसादलयात एक वेळ जेवण मिळाले नाही तर इतर ठिकाणी ते घेऊ शकतो. मात्र येथे रुग्णालयात उपचार, तपासणी योग्य होणे गरजेचेच आहे. येथे वेळकाढू धोरण उपयोगाचे नाही, म्हणून तत्परता, झटपट सेवा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांचेशी सहानुभूतीने बोलणे मार्गदर्शन करणे, त्यासाठीच डॉक्टर प्रीतम वडगावे यांचा प्रयत्न सदैव सुरू असतो. ते त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून नेहमी दिसून येते. रुग्णसेवा करत असताना त्यांनी आपल्या देगलूर गावी आपले पिताश्री सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेल्या सर्व सेवानिवृत्ती पेन्शननीधि मधून श्री साईबाबांचे भव्यदिव्य असे स्वतः मंदिर बांधले आहे
व तेथे नेहमी साईसेवा, पूजा-अर्चा, पालखी, महाप्रसाद याचे आयोजन केले जाते.हे सर्व त्यांचा परिवार हे करत असतो. अशा धार्मिक व रुग्ण सेवेतव स्वतःला वाहून घेतलेले डॉक्टर प्रीतम वडगावे यांचा दैनिक साईदर्शन परिवारातर्फे आज वाढदिवसानिमित्त यथोचित त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत असीच रुग्णसेवा, धर्मिक सेवा, समाजसेवा आपणाकडून होत राहो. अश्या शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.