धोकादायक पर्यटनस्थळावर पर्यटकांना बंदी
तीन दिवसांपूर्वी पुर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची दुर्घटना घडली याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर पुणे प्रशासनाने दुर्घटनेची गंभीर दखल घेत. जिल्हाधिकारी सुहास दिवासे यांनी मंगळवारी पुण्यातील पर्यटन स्थळांसाठी अधिसूचना काढली आहे. नव्याने लागू झालेल्या कायद्यानुसार आपदा व्यवस्थापन कायदा २००५ च्या नुसार मावळ, मुळशी, अंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, इंदापुर आणि हवेली याभागांमध्ये कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यातील पर्यटकांची काळजी लक्षात घेता. पर्यटकांच्या सुरेक्षेसाठी २ ते ३१ जुलैपर्यंत मावळ तालुक्यातील भुसी डॅम आणि पवना लेक परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे. यासह पुणे जिल्ह्यातील धोकादायक स्पॉटची लिस्ट प्रशासनाने तयार करुन ठेवली आहे. ज्यामध्ये मावळ तालुक्यातील भुसी डॅम, बेंडेवाडी, खंडाळ्याचा टायगर पॉईट, लायन पॉईट, राजमाची पॉईट, सहारा पूल, पावना लेक, टाटा बांध, घुबाद धबधबा या ठिकाणावर पर्यटकांना बंदी केली आहे. जिल्हाधिकाऱ्याने काढलेल्या आदेशानुसार पाच हून अधिक लोक एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आले. खोल पाण्यात उतरुन रील काढणे, फोटो घेणे यावर सुद्धा बंदी घालण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्यास बीएनएनएस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार कारवाई होणार.