शिर्डीतील हॉटेल मध्ये ठेवलेल्या साईभक्त तरुणीच्या सुमारे 75 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या कामगारांनीच केल्या लंपास!
शिर्डी( प्रतिनिधी )शिर्डी येथील एका हॉटेलमधून साईभक्त तरुणीच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हॉटेलमध्ये ठेवलेल्या असताना तेथून हॉटेलमधील दोघां कामगारांनी लंपास केल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात नागपूर येथील साई भक्तांनी दाखल केली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,नागपूर येथील अनिता आनंद लांडगे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की ,आम्ही आमचे कुटुंब नागपूरहून शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो.
येथे आल्यानंतर हॉटेल साई सीता पॅलेस येथे 206 नंबरची रूम घेतली. आम्ही 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी रूमचे कुलूप लावून श्री साईबाबांच्या दर्शनाला गेलो .दर्शन करून परत आलो व नंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. कोपरगाव परिसरात आल्यानंतर आपली मुलगी शिवानी निलेश बोरकर हिच्या लक्षात आले की, आपण हातातील सुमारे 75 हजार रुपये किमंतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या व दोन काचेच्या बांगड्या हॉटेल सीता पॅलेस मध्ये उशी खाली ठेवलेल्या आहेत.
तेव्हा आम्ही कोपरगावहुन परत शिर्डीला हॉटेल सीता पॅलेस येथे आलो. येथे रूम मध्ये बघितले मात्र तेथे काचेच्या दोन बांगड्या सापडल्या .मात्र सोन्याच्या दोन बांगड्या गायब होत्या. येथे अधिक चौकशी केली असता येथील हॉटेलमध्ये काम करणारे कामगार संदीप मुरलीधर जगताप व मयूर श्रीराम
वाडीभस्मे यांनी या रूमची साफसफाई केली व त्यांनी त्या दोन सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात या नागपूरच्या साई भक्तांनी दिल्याने या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1104 नुसार भादवि कलम 34 /380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.