खासदार लोखंडे यांच्या शिर्डी कार्यालयात रेकी करत चोरीच्या उद्देशाने दोघांचा प्रवेश..!
खा.सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात भरीव विकासकामे केली असुन त्यांनी जो प्रसिद्धीचा फंडा वापरायला पाहिजे होता तो वापरला नाही..माञ कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात त्यांनी केलेले काम सामान्य जनतेसमोर आहे..
तर विरोधी पक्षाचा उमेदवार हा चालताना धापा आणि गाडीत झोपा काढत असुन यांनी बीडिओ असल्यापासून ते संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत पैसे खाण्याचेच काम केले असून आता तर त्यांच्या दोन कार्येकर्त्यांनी चक्क खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाची रेकी करत पैसे चोरण्याचा प्रयत्न केला
माञ आम्ही तक्रार केली नसल्याचा गंभीर आरोप सुद्धा यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी केल्याने खळबळ उडाली असून ते दोघे कार्यकर्ते कोण याबाबत मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे..
खा.लोखंडे हे २०१४ मध्ये जसे होते आजही तसेच साधे सरळ असुन पुन्हा मतदारसंघातील जनता त्यांना भरघोस मतांनी निवडणूक देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला..