शिर्डी प्रतिनिधी/ गोदावरी नंदीचे पात्र शेतकरी बांधवाना जसे फायदेशीर ठरते तसे ते वाळु तस्करीसाठी देखील फायदेशीर ठरत असताना महसूल विभागाच्या आधिकारी व कर्मचारी याच्या हितासाठी देखील फायदेशीर ठरत असून महिन्याकाठी अवैध मार्गाने लाखो रुपये पंटरच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी सध्या कोपरगाव तहसील कार्यालयात चढोओढ अनेकांना लाचलुचपतच्या जोखडात अडकवण्यासाठी कारण ठरले असले पैशाचा मोह सुटत नसल्याने केवळ दोन जणांवर कारवाई झाली असली
तरी मुळाशी जाऊन हे दोघे कोणाच्या पाठबळावर पैसे गोळा करत होते ते कोणाच्या संपर्कात होते यांचा देखील शोध लाचलुचपत विभागाने घेतला तर मोठी पाळेमुळे उघडकीस येणार असून या बाबत काही शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेऊन या प्रकरणाची तड लावणार असल्याचे समजते
आधिक माहिती अशी की अवैध वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपीक चंद्रकांत नानासाहेब चांडे वय ३९ व अव्वल कारकुन योगेश दत्तात्रय पालवे वय ४५ यांना १५ हजाराची लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे
९ डिसेंबर रोजी हा छापा टाकण्यात आला एका खासगी तक्रारदाराने याबाबत तक्रार केली होती त्यानंतर सांपाळा लावून या दोघांना जेरबंद करण्यात आले संदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिला घार्गे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संतोष पैलकर
पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस कर्मचारी दिनेश खैरनार गणेश निंबाळकर अविनाश पवार नितीन नेटारे याच्या पथकाने हि कारवाई केली कोपरगाव तहसीलचे अनेक कर्मचारी अनेकदा लाचलुचपत कारवाई मध्ये सापडले असताना ही वाळू तस्करांना लगाम घालण्यात महसूल विभागाला यश मिळत नसल्याचे पुढे आले आहे