वेश्या व्यवसाय करणा-यांवर छापा टाकुन दोन महीलांची केली सुटका
संगमेनर शहर पोलीस स्टेशन हदिदतील वेश्या व्यवसाय करणा-यांवर छापा टाकुन दोन महीलांची केली सुटका – उप विभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उप विभाग, संगमनेर यांची कारवाई * **
दिनांक २४/१०/२०२४ रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उप विभाग, संगमनेर डॉ. कुणाल सोनवणे यांना गोपणीय बातमीय दारांकडुन बातमी प्राप्त झाली की, संगमनेर शहर पोलीस ठाणे हदिदत संगमनेर कॉलेज समोरील शारदा बेकरीमागील निर्मलनगर येथे एका बंगल्यामध्ये महीला नामे आरती किरण मोरे वय ३१ वर्ष रा. संगमनेर तसेच गुंजाळवाडी शिवारात घुलेवाडी ते राजापुर जाणारे रोडलगत एका बंगल्यात महीला ही तीचे पतीसह स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे आमीष देवुन देह व्यापारास पवृत्त करुन त्यांना वर नमुद ठिकाणावर त्यांचे राहते घरी जागा उपलब्ध करुन देवुन त्यांचेकडुन देह विक्री व्यापार करुन घेत आहे. सदर ठिकाणी बनावट ग्राहक रोख रक्कम देवुन खात्री करणेकरीता पाठविण्यात आले. बनावट ग्राहक यांचे मार्फतीने खात्री करण्यात आली त्यानंतर सदर ठिकाणी शासकिय पंच व महीला अधिकारी व अमंलदार यांचेसह बातमीतील नमुद ठिकाणी छापा टाकणेसाठी रवाना झालो.
बातमीतील नमुद ठिकाण संगमनेर कॉलेज समोरील शारदा बेकरीमागील निर्मलानगर येथे २१.४५ वा छापा टाकला असता सदर ठिकाणी एक पिडीत महीला मिळुन आली तीची सुटका करुन कुंटणखाना चालविणारी महीला आरोपी नामे १. आरती किरण मोरे वय ३१ वर्ष रा. संगमनेर व ग्राहक आरोपी नामे प्रविण देवराम वाकचौरे रा. पिंपळगाव निपाणी ता. अकोले यांना ताब्यात घेण्यात आले. सदर महीला आरोपी ही पिडीत महीलेस पुरुष ग्राहकाबरोबर शरीरसंबध करणेकरीता जागा उपलब्ध करुन देवुन कुर्टणखाना चालवुन पिडीत महीलेस तीचे इच्छेविरुदध वेश्यागमण करीता प्रवृत्त करुन तीला पुरुष गि-हाईकांना दाखवुन तीचेकडुन वेश्या व्यवसाय करुन घेवुन अवैधरित्या कुटंणखाना चालविताना व कुंटणखानासाठी लागणारे साहीत्य मोबाईल, रोख रक्कम, वाहने असा एकुण ६१,३७०/-रु किं.चे मुददेमालासह मिळुन आले आहे.
तसेच त्यानंतर बातमीतील नमुद दुसरे ठिकाण गुंजाळवाडी शिवारात घुलेवाडी ते राजापुर जाणारे रोडलगत एका बंगल्यात २२.४० वा छापा टाकला असता सदर ठिकाणी एक पिडीत महीला मिळुन आली तीची सुटका करुन कुंटणखाना चालविणारी महीला आरोपी, १. सोनाली जालींदर गुंजाळ वय २८ वर्ष रा. घुलेवाडी, ता. संगमनेर २. धीरज नवनाथ भागवत वय ३० वर्ष रा. घुलेवाडी ता. संगमनेर हे दोघे संगनमताने परुष ग्राहक नामे स्वप्निल बाजीराव गोफणे वय २२ वर्ष रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर हया या पुरुष ग्राहकाबरोबर शरीरसंबध करणेकरीता जागा उपलब्ध करुन देवुन कुटंणखाना चालवुन पिडीत महीलेस तीचे इच्छेविरुदध वेश्यागमण करीता प्रवृत्त करुन तीला पुरुष गि-हाईकांना दाखवुन तीचेकडुन वेश्या व्यवसाय अवैधरित्या कुटंणखाना चालविताना व कुंटणखानासाठी लागणारे साहीत्य मोबाईल, रोख रक्कम, वाहने असा एकुण ३१,१००/-रु किं.चे मुददेमालासह मिळुन आलेने सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करुन म. सहा. पोलीस निरीक्षक सोनल फडोळ संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.न. ८९३/२०२४ भा.न्या.सं.क. १४३,३ (५) सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली . कुणाल सोनवणे उप विभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर, पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख संगमनेर शहर पो.स्टे., स.पो.नि. कल्पेश दाभाडे वाचक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर, म.स.पो.नि.सोनल फडोळ संगमनेर शहर शहर पो.स्टे. उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अमंलदार पो.हे.कॉ. अनिल कडलग, पो.ना. राहुल डोके, पो. कॉ. राहुल सारबंदे, म.पो.हे. कॉ. शितल भोर, म. पो. कॉ. ताई शिंदे तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडील पो.कॉ. हरिश्चंद्र बांडे, पो. कॉ. आत्माराम पवार, म. पो. कॉ. सुवर्णा नवले यांनी केली आहे. गुन्हयांचा पुढील तपास पो. नि. रविंद्र देशमुख संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.