संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं की तोंड त्यांनाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना ‘तुम दो मारो हम चार मारेंगे. घाण करुन टाकलं सगळं राजकारण! सकाळी उठायचं, यांना (प्रसारमाध्यमांना) धरायचं. संयम बाळगतोय याचा अर्थ गांxx समजू नये,
असा हल्लाबोल राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर केला. तर मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज ठाकरे बोलतायत बोलू दे ना. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत,
लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलय. भाषेची शुद्धता स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी, महाराष्ट्राच्या शत्रूसाठी वापरायची. आम्ही ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत.
राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. निवडणुका आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे. फडणवीसांच स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच, त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची, काय बोलायचे आणि काय लिहायचे, याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.