पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात चालले तरी काय…? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही की काय..?नागरिकांमध्ये घबराट आणि संतापाचे वातावरण!!
शिर्डी प्रतिनिधी/
खून खुनाचा प्रयत्न हाणामारी गावठी कट्टे चोऱ्या लुटमार अशी मोडस व इतिहास असलेल्या शिर्डी लगत निमगाव कोर्हाळे येथील देशमुख चारीवर घराचे भाडे थकल्याने एकत्रित राहत असलेल्या दोघात वाद झाल्याने धर्मेंद्र मनोहर मेहता वय ४० राहणार देशमुख चारी निमगाव कोराळे व श्रीनिवास शेसा शेट्टी वय ७४ रा माटुंगा मुंबई हल्ली मुक्काम देशमुख चारी निमगाव कोराळे या दोघात शनिवार १७ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोघात थकीत असलेल्या घरभाडे देण्याच्या कारणांमुळे मोठे वाद जोरजोरात सुरू झाले आरोपी धर्मेंद्र मेहता यांने मयत श्रीनिवास शेट्टी यास मानेला धरून रूममध्ये असलेल्या भिंतीवर जोरजोरात आपटले त्यात शेट्टी हा गंभीर जखमी झाल्याने नगर येथे सिव्हिल दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना १८ फेब्रुवारी रोजी जखमी श्रीनिवास शेसा शेट्टी हा वयोवृद्ध ७४ वर्षाचा इसम सकाळी ८वाजता मयत झाला अशी फिर्याद घर मालकीण अलका बाळासाहेब चव्हाण वय ४२ धंदा घरकाम राहणार निमगाव कोराळे ता राहता यांनी १९ फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलिसात दिल्याने शिर्डी पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र मनोहर मेहता वय ४० राहणार शिर्डी यास तात्काळ शिताफीने अटक करून त्याच्या विरोधात भादवी ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील सागर काळे संतोष पगारे व पोलीस पथकाने भेट दिली असून आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहे