नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं. समीर भुजबळांनी मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली.
यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. ”आज तुझा मर्डर फिक्स आहे”, असे सुहास कांदे समीर भुजबळांना संतापून म्हणाले.सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामकागार यांना डांबून ठेवल्याचा आरोप देखील भुजबळ यांनी केला.
यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे दिसून आले. ”आज तुझा मर्डर फिक्स आहे”, असं म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली.