दीपक केसरकर यांनी घेतले साईदर्शन
मनोज जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणातून जे मिळावले ते आपल्या भाषणातून गमवायला नकोय. मराठा आरक्षणाचे सगळे श्रेय जरांगे पाटलांना मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना मराठा आरक्षण बाबत दिलेल्या शब्द पूर्ण होतो का नाही. तो पर्यंत तरी जरांगे पाटलांनी संयम ठेवायला पाहिजे असल्याच थेट सल्ला शालीय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जरांगे पाटलांना दिलाय.
शालीय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी १८ नोहेंबर रोजी शिर्डीत येवुन साई मंदिरात जावुन साई समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी केसरकर यांनी साईबाबांची दुपारची माध्यन्ह आरतीलाही हजेरी लावलीय. साईबाबांच्या आरतीनंतर केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीवर पिवळ्या रंगाची शॉल चढवत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलंय. साईबाबांचे दर्शन घेवून मंदिराबाहेर आल्यानंतर केसरकर यांनी मंदिर परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय.
मराठा आरक्षणावर बोलतांना केसरकर यांनी, ओबासीच्या आरक्षणाला धक्का न लावता,मराठा समाज्याला आरक्षण देण्याच्या भूमिकेत सरकार आहे. त्यामुळे आता जरांगे पाटलांनी राज्यात दौरे करणे कितपत योग्य आहे. याचा विचार जरांगे पाटलांनी केला पाहीजे, शेवटी प्रत्येक एक्शनला रिँक्शन असते. त्यामुळे दोन्ही कडुन जे सुरू आहे ते थांबवले पाहीजे. कोणीही एकमेकां विरुद्ध स्टेटमेट करु नये. शेवटी जातीय सलोखा कायम राहीला पाहीजे, असे मत शालीय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.
सामाजिक वातावरण कुलीशीत करण, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. जातीय सलोखा राखण्याची परंपरा, छत्रपती शिवाजी महारांजांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवुन,जातीय सलोखा बिघडविल्या जाणं हे दुर्दैवी असून. त्याच्या सारख दुसरं दुःख कोणतेही नाही, असेही यावेळी दिपक केसरकर म्हणाले आहे. आपल्याला समाज्याचे जर हिताचे करायचे असेल तर समाज्यात कशी गरिबी आहे. याच रेकॉर्ड तयार करायला पाहीजे तरच न्याय मिळु शकतो. एकीकडे न्याय मागायचा दुसरीकडे न्याय मिळण्यासाठी मदत करायची नाही. असे कोणाकडूनही घडूनये अश्या शब्दात केसरकर यांनी जरांगे पाटील यांचे नाव न घेता टीका केलीय.