राजकीय
भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावलीय
भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावलीय. यानंतर त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके यांनी शेलार यांचा शॉल, साई मूर्ती देऊन सन्मान केलाय. साई दर्शन घेऊन शेलार मंदिराबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुंबई येथे 15 नोव्हेंबर रोजी भारत-न्युझीलंड यांच्यात झालेल्या सेमिफायनल सामन्यात भारताने न्युझीलंडचा पराभव करत घवघवीत यश मिळवलं आहे. येणाऱ्या फायनल मध्येही भारत जिंकणार असल्याचं भाजपा नेते आशीष शेलार म्हणाले. भारत फायनलही जिंकावा अशीही प्रार्थना यावेळी आशिष शेलार यांनी साईबाबांच्या चरणी केलीय. यावेळी मात्र शेलारांनी राजकीय मुद्द्यावर बोलण्यास टाळले.
जाहिरात